‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या आणि सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि.7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात कौशल्य विकास आणि मुद्रा योजना' या विषयावर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शनिवार, दि. 8 आणि सोमवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.


औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा ठाणे जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची कल्पना, या केंद्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, केंद्र चालविण्यासाठी खासगी संस्थांचा सहभाग, प्रत्यक्षात मुलांना नोकरी मिळावी किंवा स्वयंरोजगार करणे शक्य व्हावे म्हणून केंद्रामार्फत करण्यात येणारे प्रयत्न, केंद्राला ठाणे औद्योगिक परिसरातील कंपन्यांचा मिळणारा प्रतिसाद, प्रधानमंत्री मुद्रा योजना,योजना राबविण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा, मुद्रा योजनेची कौशल्य विकासाशी सांगड, योजना अधिक परिणामकारकरित्या लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी केले जाणारे प्रयत्न याबाबतची सविस्तर माहिती श्री. नार्वेकर यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा