पारनेर सहकारी साखर कारखाना कामगारांच्या समस्यांबाबत सहकारमंत्र्यांकडून आढावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 4 : पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीनंतर मूळ कर्मचारी आणि संबंधित शेतकऱ्यांसंदर्भात क्रांती शुगर कारखान्याच्या संचालक मंडळाने सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा, अशा सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्या.

पारनेर सहकारी साखर कारखाना हा राज्य सहकारी बँकेने क्रांती शुगर खासगी कंपनीला विक्री केला असून, संबंधित शेतकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज  बैठक पार पडली.श्री.देशमुख म्हणाले, क्रांती शुगर खासगी कंपनीने मूळ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेऊन, स्थानिक पातळीवरील कामगारांची देणी परत करावी. गाळपेरणी संदर्भातील प्रस्ताव, पतसंस्था यासंदर्भात भागधारकांची शेअर्सच्या रकमेचे देणे आदी विविध समस्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा, असे श्री.देशमुख यांनी सांगितले.

या बैठकीला साखर आयुक्त कार्यालयाचे सह संचालक राजेश सुरवसे, संगिता डोंगरे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक सुनील कदम तसेच सहव्यवस्थापक अमित जोशी आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा