मौजे कुंभारी येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 5 : सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी येथे
एमआयडीसी स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी दिले.

उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये राज्यमंत्री पोटे-पाटील यांनी नवीन एमआयडीसी स्थापन करण्याच्या अनुषंगाने आवश्यक बाबींची पूर्तता करुन प्रस्ताव तातडीने सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

या बैठकीला कामगार राज्यमंत्री विजय देशमुख उपस्थित होते. तसेच जलसंपदा विभागाचे अवर सचिव सु. ना. ऐवले, उद्योग विभागाचे उपसचिव डॉ. ना. को. भोसले, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास पानसरे आदी अधिकारी उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा