श्रीमती सुचिता भंडारी यांना मिळाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा आधार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतशेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच,अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या अपघातामुळे कुटंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस/त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता शासनाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित केली आहे. यातून अनेक कुटुंब उभी राहिली आहेत.

कोरेगाव तालुक्यातील देवूर गावातील भंडारी कुटुंबावर असाच अघात झाला आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेने मोडून पडलेल्या कुटुंबाला आधार दिला... कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील सुचिता भंडारी सांगतात , " माझ्या पतीचे 2016 मध्ये मोटार चालू करायला जावून विहिरीत पाव घसरुन पडल्यामुळे निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर परिस्थिती खूप खालावली. त्यात आमच्या कुटुंबात कोणताही पुरुष नाही. मी, माझी मुलगी व सासु असा परिवार आहे. कर्ता पुरुषच गेल्यामुळे मुलीची आणि सासुची जबाबदारी माझ्यावर पडली. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायाचा हा मोठा प्रश्न माझ्यावर समोर उभा होता. 3 एकर शेती आहे तीही पावसावर अवलंबून, तसा आमचा उत्तर कोरेगावच्या भागात खूपच कमी पाऊस पडतो. कृषी विभागाच्या सहकार्यामुळे मला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत 2 लाखाची मदत मिळाली आहे. या पैशामुळे माझ्या मुलीचे पुढचे शिक्षण नक्की होईल. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना योजना अतिशय चांगली असून माझ्या सारखे अनेक कुटुंब या योजनेमुळे खंबीरपणे उभे राहतील.

युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी,
सातारा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा