‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात उद्या सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांची 'दिव्यांग धोरण २०१८' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  शुक्रवार दि. ७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


राज्याच्या दिव्यांग धोरणाला मंत्रिमंडळाची मिळालेली मंजुरी, धोरणासाठी करण्यात आलेला पाठपुरावा, दिव्यांग धोरण २०१८ ची वैशिष्टये, दिव्यांगांना होणारा फायदा, धोरणात दिव्यांग मुले व स्त्रिया, निर्वाह भत्ता व निवृत्ती वेतन, उद्योग, घरबांधणीचा करण्यात आलेला विचार, मनोरंजन केंद्रांचा समावेश आदी विषयांची माहिती श्री. बडोले यांनी जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा