डॉ. म.सु.पाटील लिखित 'सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध' समीक्षा ग्रंथास साहित्य अकादमी पुरस्कार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनवी दिल्ली, दि. 5 :  प्रसिद्ध मराठी चिंतनशील लेखक डॉ. .सु.पाटील लिखित 'सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध' या समीक्षा ग्रंथास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष 2018 साठीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज  जाहीर झाला आहे.


रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी पत्रकार परिषदेत देशातील 24 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावांची  घोषणा केली.  चिंतनशील लेखक डॉ. म.सु.पाटील लिखित 'सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध' या समीक्षा ग्रंथाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.
'सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध' समीक्षा ग्रंथाविषयी...

मौज प्रकाशनने १८ एप्रिल २०१३ मध्ये सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोधया ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली. या ग्रंथात डॉ. म.सु.पाटील यांनी कलानिर्मितीच्या आदिम प्रेरणा, त्या प्रेरणांशी अनुबंध असणारे छंद, लय, आत्माविष्कार, भावक्रीडा इत्यादी विविध पैलूंचा मानसशास्त्रीय अंगाने मागोवा घेतला आहे. सर्जनशक्तीचे विकसन कसे होते याचा धांडोळा घेतानाच विचार, तत्त्वज्ञान, सौंदर्य आणि कलामीमांसा यांचे वेचक कवी आणि त्यांच्या कविता यांच्या उदाहरणांतून अभिजात आणि रोमँटिक काव्यविचाराशी निगडित असलेले नातेही ते उलगडून दाखवतात. त्याची व्याप्ती विसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वातील नवकवीच्या काहीशा वास्तवनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ कवितांपर्यंत पोचते.डॉ. पाटील यांच्या पीएचडीवर आधारित हे तिसरे पुस्तक आहे. यापूर्वी २००४ मध्ये तुकाराम : अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे’  आणि  २००६ मध्ये  ज्ञानेश्वरीचा काव्यबंधही दोन पुस्तके मुंबई येथील शाब्दल प्रकाशनने प्रसिद्ध केली आहेत. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या काव्याचा अभ्यास करताना कोणता काव्य विचार उपयुक्त ठरेल याचा अभ्यास करण्याच्या शोधातून या तिसऱ्या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. भरतमुनी आणि प्लेटो-ॲरिस्टॉटल यांच्या पासून गेल्या शतकाच्या साठ-सत्तरच्या दशकापर्यंत झालेल्या काव्यविचारांचा या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या ग्रंथात एकूण सात प्रकरणे असून यात सर्जनाच्या प्रेरणा, कविमन, काव्यात्म अनुभव आदींचा समावेश आहे. चित्रलिपीकोंकणी भाषेतील श्रेष्ठ कलाकृती

 कोंकणी कवी परेश नरेंद्र कामत यांच्या 'चित्रलिपी' या काव्यसंग्रहास कोंकणी भाषेतील सर्वोत्कृष्ट कलाकृतीचा तर प्रसिद्ध लेखिका चित्रा मुद्गल लिखित 'पोस्ट बॉक्स नं. २०३-नाला सोपारा' या कादंबरीस हिंदीतील सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी  २९ जानेवारी २०१९ रोजी हा पुरस्कार प्रदान  करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक ना.धो.महानोर, मधुकर वाकोडे आणि प्रा. रमेश वरखेडे  यांचा समावेश होता.                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा