माजी खासदार डॉ. सरोदे यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 2 : माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्या निधनाने समर्पित भावनेने काम करणारा एक ज्येष्ठ कार्यकर्ता गमावल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.


मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ. सरोदे हे जनसंघापासूनचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. भारतीय जनता पार्टीचे फारसे उमेदवार निवडून येत नसण्याच्या काळात जळगाव-रावेर परिसरात पक्षाची पाळेमुळे रूजविण्यात त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी अफाट जनसंपर्क आणि आपल्या विचारांप्रती निष्ठा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा