मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिसेंबरच्या 'लोकराज्य'अंकाचे प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 6: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते 'क्रांतिसूर्याला विनम्र अभिवादन' या डिसेंबर-2018 च्या 'लोकराज्य' अंकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, महापालिका आयुक्त अजोय मेहता आदी उपस्थित होते.
'क्रांतिसूर्याला विनम्र अभिवादन' या लोकराज्यच्या विशेषांकात डॉ. बाबासाहेबांचे विविध पैलू उलगडून दाखवणाऱ्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर महापरिनिर्वाण दिन कसावा पाळावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे कार्य, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा संविधान व शासनाच्या उपक्रमांसंदर्भातील आपले संविधान, आपले सामर्थ्य हा लेख तसेच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक लोकशाहीसंबंधी लेखाचा या अंकात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसुरी येथे प्रशिक्षणार्थी नागरी सेवा अधिकाऱ्यांना उद्देशून केलेले भाषण, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधलेल्या नागरिकांच्या यशकथांचाही या अंकात समावेश करण्यात आला आहे. या विशेषांकाचे अतिथी संपादक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. या अंकाची किंमत 10 रुपये असून तो सर्वत्र सर्वत्र उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा