'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या आणि सोमवारी अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शनिवार दि. 1 आणि सोमवार दि.3 डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.


राज्यातील अल्पसंख्यांकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी शासन स्तरावर करण्यात येणारे प्रयत्न, अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्र्यांचा 15 कलमी कार्यक्रम व तज्ज्ञ संस्थांच्या अभ्यासगटांचे स्वरूप, मौलाना आझाद मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना, दुर्बल घटक व वंचित गटांतील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी निवासी शाळा, डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कामकाजाचे स्वरूप, हज यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरुंच्या सोयीसाठीचे निर्णय, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शहरी भागात वसतिगृहांची सुविधा तसेच अल्पसंख्याकांच्या  समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष हेल्पलाईन सेवा याबाबतची सविस्तर माहिती श्री. तागडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा