'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या नेदरलँडचे मुख्य पोलीस आयुक्त जमील म्यूसेन यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. २९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात नेदरलँडचे मुख्य पोलीस आयुक्त जमील म्यूसेन यांची 'मी कसा घडलो' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. ३० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत पत्रकार धर्मेंद्र जोरे यांनी घेतली आहे.

जमील म्यूसेन यांनी या मुलाखतीत मुंबईतील डोंगरीच्या चिल्ड्रन एड सोसायटीतील दिवस, डच पालकांनी दत्तक घेतल्यानंतरचा प्रवास, त्यानंतर शिक्षण आणि नोकरीचा अनुभव,सैन्यातील अधिकारी ते पोलीस आयुक्त पदापर्यंतची प्रेरणादायी वाटचाल, डोंगरी चिल्ड्रन एड सोसायटीला आपल्या कुटुंब आणि मित्रांसमवेत दिलेली भेट, चिल्ड्रन एड सोसायटीला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल या विषयी सविस्तर माहिती 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा