पुणे येथील झोपडपट्टीस लागलेल्या आगीबाबत विविध यंत्रणांच्या समन्वयाने उपाययोजना करणार - रवींद्र वायकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. २८ : पुण्याच्या शिवाजीनगरमधील संगमवाडी येथील पाटील इस्टेट या झोपडपट्टी क्षेत्रात सिलेंडरच्या स्फोटाने लागलेल्या आगीमुळे काही झोपड्यांचे नुकसान झाले असून झोपडपट्टीस लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे व पुणे महापालिका, जिल्हाधिकारी व पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या समन्वयाने पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

ही झोपडपट्टी २१ हजार चौ.मी. क्षेत्रात असून या क्षेत्रात १ हजार १७६ झोपड्या आहेत. आगीच्या दुर्घटनेत सद्यस्थितीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुपारी ४ वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. १९८७ मध्ये हे क्षेत्र झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. घोषित झोपडपट्टी क्षेत्र अंदाजे १७ हजार चौ.मी. आहे, असेही यावेळी श्री. वायकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा