'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य  व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांची दृढनिश्चय... गोवर व रुबेला निर्मूलनाचा' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. 27 आणि बुधवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.  निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.


राज्यभरात  युद्धपातळीवर गोवर व रुबेला आजाराचे उच्चाटन करण्यासाठी लसीकरण मोहिमेची सुरूवात केली जात आहे. गोवर आणि रुबेला आजारांचे दुष्परिणाम, राज्यात या लसीकरण मोहिमेसाठी करण्यात आलेली तयारी आदीविषयी सविस्तर माहिती डॉ. सावंत यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा