सामाजिक प्रश्नाबाबत महाराष्ट्र एकजुटीने उभा; मुख्यमंत्र्यांकडून सर्व विधिमंडळ सदस्यांचे आभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


·      मराठा समाज आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर
·      शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ
मुंबई, दि. 29 : मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून आरक्षण मंजूर करणारा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते, गटनेते, मंत्री यांच्यासह सभागृहातील सर्व सदस्यांचे विशेष आभार मानले. राजकीय विरोध बाजूला ठेवून सामाजिक प्रश्नाबाबत महाराष्ट्र एकत्र येतो हे पुन्हा सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून शिक्षण देण्यासह शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिकप्रश्नी सर्व राजकीय पक्ष आपली राजकीय भूमिका बाजूला ठेवून एकत्र येतात हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले आणि दोन्ही सभागृहातील सदस्यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा