फ्यूचर मेकर दोषी आढळलल्यास नियमानुसार कारवाई - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 29 :  उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील चैन मार्केटिंगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक फ्यूचर मेकर या जैविक खते व औषधांची विक्री करणाऱ्या कंपनीने केल्याबाबत  शेतकऱ्यांची लेखी किंवा तोंडी स्वरुपात तक्रार प्राप्त झालेली नाही. फ्यूचर मेकर या कंपनीस राज्य व जिल्हा स्तरावरुन विक्रीचा परवाना दिलेला नाही. राज्यातील निरिक्षकामार्फत या प्रकरणाची तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये मे. फ्यूचर मेकर दोषी आढळले तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा