वर्धा येथील नवीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 29 : वर्धा येथील नवीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.


मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस आमदार पंकज भोईर यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर या कार्यालयाचे विभाजन करून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर आणि वर्धा अशी दोन स्वतंत्र कार्यालये करण्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी, आदिवासी जनता आणि वर्धा जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समिती या सर्वांची मागणी होती. त्याप्रमाणे  नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या वर्धा जिल्ह्याच्या आढावा बैठकीत वर्धा येथे नवीन एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय सुरु करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार वर्धा येथे स्वतंत्र आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे काम वेगाने पूर्ण करावे, अशा सूचना अर्थमंत्र्यांनी तथा वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आज दिल्या.


बैठकीत पद हस्तांतरणावरही चर्चा झाली. याशिवाय लागणाऱ्या अतिरिक्त नवीन पदभरतीसाठी मान्यता देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक लेखाअधिकारी, कार्यालय अधीक्षक व संशोधन सहायक पाच नवीन पदभरतीच्या तसेच त्या अनुषंगिक निधीची मागणी करणाऱ्या नस्तीस वित्त विभागाने मान्यता द्यावी, अशा सूचनाही वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा