नागपूर सुधार प्रन्यासने क्रीडा संकुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत नागपूर येथील उमरेड रोड येथील क्रीडा संकुलाचे काम हाती घेऊन तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील कामगार क्रीडा संकुलासंदर्भातील बैठक आज विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार सर्वश्री सुधाकर कुवळे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार,नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले,  क्रीडा संकुल उभारण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत निविदा काढण्यात आली असून या निविदेची अंमलबजावणी आणि पुढील कार्यवाही नागपूर सुधार प्रन्यासमार्फत करण्यात यावी. तसेच नागपूर सुधार प्रन्यासने क्रीडा संकुलाचे अपूर्ण राहिलेले काम तातडीने पूर्ण करावे. नागपूर सुधार प्रन्यासने उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगारांना, त्यांच्या मुलांनाही क्रीडा संकुलामध्ये सभासदत्व द्यावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा