आरक्षण विधेयक, २०१८ विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरिता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक, 2018 आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथम विधानसभेत आणि नंतर विधानपरिषदेत हे विधेयक मांडले. विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधानपरिषदेत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हे विधेयक वाचून दाखविले. आवाजी मतदानाने हे विधेयक संमत करण्यात आले.


विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, सदस्य सर्वश्री अजित पवार, गणपतराव देशमुख यांनी पाठिंबा दर्शविला. तर, विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विधेयकाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सदस्य सर्वश्री भाई जगताप, ॲड. अनिल परब, जयंत पाटील, विनायक मेटे, जोगेंद्र कवाडे, पदुममंत्री महादेव जानकर यांनी पाठिंबा दर्शविला व मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

सर्व विरोधी पक्ष तसेच सभागृहाच्या सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा