महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत





मुंबई दि. 28 : महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज विधानभवन येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.



यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पदुममंत्री महादेव जानकर, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्यासह विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानभवन येथील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा