उद्योग, गृहनिर्माण, रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्रच अग्रेसर - विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 30 : प्रधानमंत्री आवास योजना, औद्योगिक गुंतवणूक, थेट परकीय गुंतवणूक, रोजगार निर्मिती, राज्याची अर्थव्यवस्था या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे देशात आघाडीवर असून इतर महत्त्वाच्या योजनाही लवकरच पूर्णत्वास येणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत व्यक्त केला.


अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुंबई तसेच राज्यातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, गृहनिर्माण, राज्याच्या अर्थव्यवस्थेची मजबुती, नवोद्योगांची (स्टार्टअप) सुरुवात, कायदा व सुव्यवस्था आदी अनेक विषयांना स्पर्श केला.


प्रधानमंत्री आवास योजनेत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माहिती दिली की, प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) ग्रामीण चे 2020 पर्यंत राज्याला 7 लाख 38 हजार घरांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 5 लाख 91 हजार घरांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 5 लाख 82 हजार घरे पूर्ण करण्यात आली आहेत. पीएमएवाय शहरी अंतर्गत 9 लाख 1 हजार घरांच्या उद्दिष्टापैकी 4 लाख 31 हजार 465 घरांचे काम सुरू केले आहे. सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील साडेदहा लाख लोकांना 2019 पर्यंत ग्रामीण घरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


समृद्धी महामार्ग  हा राज्याच्या विकासाचा महामार्ग
समृद्धी महामार्ग  हा राज्याच्या विकासाचा महामार्ग असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या मार्गामुळे राज्यातील 10 जिल्हे थेट तर 14 जिल्हे अप्रत्यक्षरित्या याप्रमाणे एकूण 24  जिल्हे जोडले जाणार आहेत. राज्यातील चारही विभागांचा विकास यामुळे  होणार आहे. कृषी क्षेत्राशी निगडित उद्योगांना चालना मिळणार आहे.


राज्यस्तरीय योजनांवर योजनांवर 2018  मध्ये 67 हजार 831 कोटी  रुपये  खर्च करण्यात  आला आहे. अनुसूचित जाती उपयोजनांवर 9 हाजर 949 कोटी  रुपये  तर अनुसूचित जमाती उपयोजनांतर्गत राज्यामध्ये 8 हजार 970 कोटी  रुपये  खर्च  करण्यात आला आहे.     सकल राज्य  उत्पन्नाशी राजकोषीय तुटीचे  प्रमाण घटले आहे असेही ते म्हणाले.


मुंबईत 258 कि.मी.च्या मेट्रोच्या कामांना मान्यता
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबईसाठी मेट्रो, ट्रान्सहार्बर लिंक, सागरी सेतू, कोस्टल रोड असे दळणवळण प्रकल्प गतीने राबविण्यात येत आहेत. दिल्लीनंतर सर्वाधिक लांबीचे मेट्रोमार्ग मुंबईमध्ये होत असून 258 कि.मी. लांबीच्या मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईत मेट्रो प्रकल्पांची  कामे वेगाने सुरु आहेत. पुणे मेट्रोचे काम देखील गतीने सुरू असून पहिल्याच वर्षात 25 टक्के काम  पूर्ण केले आहे. दुसऱ्या टप्प्यात शिवाजीनगर ते हिंजेवाडी या मेट्रो प्रकल्पासाठी देशात पहिल्यांदाच व्हायाबिलीटी गॅप फंडींग या संकल्पनेचा वापर करण्यात आला आहे. नागपूर मेट्रोचे 73 टक्के काम पूर्ण झाले असून पुढी मार्चपर्यंत 1 मार्गिका पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.


नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या कोस्टल रोडच्या कामांना राज्य शासनाचा प्राधान्यक्रम असून वांद्रे- वरळी सी लिंक ला जोडून होत असलेल्या वांद्रे- वर्सोवा सी लिंक बरोबरच नवीन वर्सोवा ते  विरार सी लिंक करण्याच्यादृष्टीनेही सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याबरोबरच ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पासाठी जिओ टेक्निकल सर्वेक्षण व समुद्रातील बोअरींगचे काम सुरु करण्यात आले आहे.


कौशल्य विकास
राज्यात रोजगारात वाढ झाली असून 2 लाख सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शिकाऊ उमेदवारी अंतर्गत राज्यात 2 लाख शिकाऊ उमेदवारांना रोजगार प्राप्त झाले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांपैकी 1 लाख 60 हजार उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे.  

नवी मुंबई विमानतळ
नवी मुंबई विमानतळाचे काम गतीने सुरु असून डिसेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे. कामाची गती पाहता मार्च ते एप्रिल 2020 पर्यंत विमानतळाची एक धावपट्टी आणि टर्मिनलची इमारत पूर्ण होईल, असा विश्वास आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारली असून महिला वर्गामध्ये जागृती आल्यामुळे अन्यायाविरोधीच्या गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पुरुषी मानसिकतेला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.  

अंतिम आठवडा प्रस्ताव सदस्य छगन भुजबळ यांनी मांडला. चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, सुनील केदार, जितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला.
0000

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित
पुढील अधिवेशन 18 फेब्रुवारी 2019 ला मुंबईत

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आले. राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता करण्यात आली. पुढील अधिवेशन विधानभवन मुंबई येथे १८ फेब्रुवारी २०१९ पासून होणार आहे.
००००
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि. 30.11.2018

अधिवेशन कालावधीतील महत्त्वाचे निर्णय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतØ दुष्काळासंदर्भातील निर्णय
·   दुष्काळाशी सामना करण्यासाठी राज्याकडून 3 हजार कोटींची तरतूद. तसेच केंद्र शासनाकडे 7 हजार 522 कोटींचा प्रस्ताव.
·   अजूनही काही तालुक्यांची दुष्काळामध्ये समाविष्ट करण्याची मागणी असून त्याबाबत विचार करण्यासाठी उपसमिती स्थापन.
·   विद्युतदेयक न भरल्याने विद्युतपुरवठा बंद केलेल्या सर्व नळ पाणी  पुरवठा योजना सुरू करणार. त्यांचे 1 वर्षाचे विद्युतदेयक शासन भरणार असून उर्वरित देयक पुनर्गठित करुन देण्यात येणार.
·   टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले असून ते तालुका स्तरावरही आपले अधिकार सोपवू शकतील.
·   जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वनविकास, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विकास योजना, राष्ट्रीय  कृषी विकास योजना आदींमधून चारा उत्पादन घेतले जाणार. याशिवाय गाळपेर क्षेत्रामध्ये चारा उत्पादनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती. राज्यभरात सुमारे 2 हजार हेक्टर गाळपेर क्षेत्र शोधून त्यावर चारा उत्पादन घेतले जाणार. आवश्यकतेप्रमाणे चारा छावण्यादेखील सुरु केल्या जातील.
·   रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) 50 दिवस अतिरिक्त मजुरी देण्यासंदर्भातचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर. केंद्राचा निधी आणि राज्याचा निधी मिळून 215 दिवसांच्या मजुरीचे नियोजन. यापूर्वी समाविष्ट नसलेल्या कामांचा मनरेगामध्ये अंतर्भाव करण्याचा निर्णय.
·   दुष्काळामुळे 82 लाख 27 हजार 166 शेतकऱ्यांचे जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक पिकांचे एकूण 85 लाख 76 हजार 367 हेक्टर क्षेत्र बाधित. अधिक पडताळणी केल्यानंतर यामध्ये वाढ करण्यात येणार.
·   दुष्काळग्रस्त भागातील उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव. आवश्यक तेथे टँकरने पाणीपुरवठा. पशुधनासाठी पाणी व चारा, रोहयोची कामे, रेशनकार्डधारकांसह ते नसलेल्यांना रेशनकार्ड देऊन धान्यपुरवठा. शालेय  मुलांसाठी उन्हाळी सुट्टयांमध्येही मध्यान्ह भोजन योजना आदी सर्व उपाययोजना.
·   ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 या तीन महिन्यांचा 6 हजार 931 गावे आणि 5  हजार 811 वाड्यांचा 13 हजार 755 योजनांसाठीचा 244 कोटी रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर. तसेच जानेवारी ते जूनचा टंचाई आराखडा मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असून 203 कोटी रुपये उपलब्ध.
·   मुख्यमंत्री पेयजल योजनेत 1 हजार 600 कोटी रुपयांच्या 780 योजनांचे काम सुरू. राष्ट्रीय पेयजल योजनेत गेल्या चार वर्षात राज्यात 6 हजार गावांच्या 4 हजार 600 कोटींच्या योजना पूर्ण. यावर्षी या योजनेचा 10 हजार 583 गावांचा 8 हजार कोटी रुपयांचा आराखडा मंजूर.
·   जलयुक्त शिवार योजनेत जलसंधारण, बांधबंदिस्ती आदी सर्व उपाययोजना करुन 16 हजार गावांची कामे पूर्ण. झालेल्या सर्व कामांचे थर्ड पार्टी ऑडिटची व्यवस्था. यासोबत गोखले इन्स्टिट्यूट, आयआयटीसारख्या संस्थांकडून पुन्हा ऑडिट करण्यात येणार.

Ø इतर महत्त्वाचे...
·   भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना विधिमंडळात श्रद्धांजली.
·   राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी विजय भास्करराव औटी यांची अविरोध निवड.
·   अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्या व्यक्ती किंवा आस्थापनांवर कठोर कारवाईसाठी आजन्म कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद.
·   वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना 10 लाख रुपयांऐवजी आता 15 लाख रुपयांची आर्थिक मदत.
·   युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना देण्यात येणारी रक्कम वाढवून 25 लाख करण्याचा यापूर्वीच निर्णय. परिवारास ही रक्कम 48 तासांच्या आत सन्मानाने सुपूर्द करण्याचे आदेश. शहिदांच्या पत्नींना मिळणारी तीन हजार रुपयांची पेंशन वाढवून सहा हजार करण्यात येणार.
·   मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल 543 गुन्ह्यांपैकी गंभीर स्वरुपाचे 46 गुन्हे आणि भीमा-कोरेगाव दुर्घटनेच्या अनुषंगाने दाखल 655 गुन्ह्यांपैकी 63 गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू.
·   आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी टाटा इन्स्ट‍िट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेच्या अहवालावर आधारित शिफारसी केंद्राला सादर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात. कार्यवाहीचा कृती अहवाल  पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल.
·   राज्यातील रस्त्यामधील अपघातांमध्ये जखमी झालेल्या व तत्काळ वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेल्या व्यक्तीस स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेंतर्गत अधिवासाच्या अटीशिवाय 74 उपचारांच्या वैद्यकीय सेवा नजीकच्या अंगीकृत रुग्णालयामधून पहिल्या 72 तासांसाठी देण्यात येणार.
·   लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत ऊसतोड कामगारांची नोंदणी सुरु. प्रथम टप्प्यामध्ये योजनेसाठी 20 कोटी रुपये.
·   आदिवासी भागातील वन हक्क पटट्यांची प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासह या प्रलंबित दाव्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळी सवलती देण्यात येणार. वन हक्क कायद्यामध्ये समग्र विशेष आराखडा तयार करून आदिवासींना न्याय देणार.
·   तातडीच्या प्रसंगी स्थानिक स्तरावर औषधे उपलब्ध व्हावी व रुग्णसेवेत खंड पडू नये यासाठी अधिष्ठाता (डीन) यांना असलेल्या स्थानिक औषध खरेदीच्या अधिकारात पाच हजार रुपयांवरून एक लाख रुपये प्रतिदिन इतकी वाढ. तसेच मंजूर वार्षिक अनुदानाच्या 10 टक्के स्थानिक खरेदीची मर्यादा 20 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय.
·   जलसंपदा विभागाच्या अधीनस्त प्रकल्पांच्या विस्तार व सुधारणा आणि विशेष दुरुस्तीसाठी आता मंजूर योजनांतर्गत अनुदानाच्या 2 टक्क्यांत वाढ करून 10 टक्क्यांपर्यंत निधी खर्च करण्यास मंजुरी.
·   खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मूठा उजवा कालवा फुटीप्रकरणी पुण्याच्या मुख्य अभियंत्यांच्या (स्थापत्य) अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय उच्चस्तरीय चैाकशी समिती. शासनास १५ डिसेंबपरपर्यंत अहवाल सादर करणार. या दुर्घटनेत पूर्णत: बाधित झालेल्यांना प्रति कुटुंब 11 हजार रुपये तर अंशत: बाधित कुटुंबांना 5 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय.
·   शाळांच्या पटपडताळणी मोहिमेमध्ये बोगस पटसंख्या दाखवून गैरप्रकार केलेल्या शाळांवर येत्या दोन महिन्यात गुन्हे दाखल करण्यात येणार.
·   अनुदानास पात्र असणाऱ्या अघोषित शाळांना 20 टक्के अनुदान देण्याबरोबरच घोषित शाळांना पुढील २० टक्के अनुदान देण्यात येणार. राज्यातील विविध शाळांमधील सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार.
·   संस्कृत भाषेच्या जतनासाठी संस्कृत भाषेतून कला शाखेचा पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्रयत्नशील.
·   राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत यापुढे राज्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर करण्यात येणार.
·   मुंबई शहर व उपनगरामध्ये लोकसंख्येच्या आधारावर व राष्ट्रीय मानकाप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार.

Ø दोन्ही सभागृहांत मंजूर झालेली विधेयके

----------------------------------------
   दोन्ही सभागृहांत मंजूर -      20
   विधान सभेत प्रलंबित -          06  
   विधान परिषदेत प्रलंबित-     01
                 मागे घेतलेली विधेयके-      01
                 -------------------------------------------
०००००००


सन 2018 चे राज्य विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन, मुंबई

विधेयकांची यादी


दोन्ही सभागृहात संमत विधेयके


(१)     सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र.75:- महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2018 (विधानसभेत संमत दि. 22.11.2018) (विधानपरिषदेत संमत 28.11.2018)

(२)     सन 2018 चे विधानसभा विधेयक  क्र. 63 .-   मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती  व औद्योगिक नागरी (सुधारणा) विधेयक, 2018.  (नगर विकास विभाग)( निवडून आलेल्या उमेदवाराने अगोदरच जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे अशा निवडून आलेल्या उमेदवारांनी त्याने सादर केलेल्या हमीपत्रात नमूद केलेल्या मुदतीच्या आत, जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, केवळ एवढ्याच कारणावरून ते उमेदवार निरर्ह ठरणार नाहीत याची सुनिश्चिती करण्यासाठी, त्या निवडून आलेल्या उमेदवारांना असे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदत वाढवून देण्याची तरतूद करणे). (अध्यादेश क्रमांक 2०/2018 चे रूपांतर) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 19.11.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 20/22/26.११.2018) (विधानसभेत संमत दि. 26. 11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 27/28.11.2018) (विधानपरिषदेत संमत 28.11.2018).

(३)     सन 2018 चे विधानसभा विधेयक  क्र.66.- .-   महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, 2018. (ग्राम विकास विभाग)( निवडून आलेल्या उमेदवाराने अगोदरच जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे अशा निवडून आलेल्या उमेदवारांनी त्याने सादर केलेल्या हमीपत्रात नमूद केलेल्या मुदतीच्या आत, जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, केवळ एवढ्याच कारणावरून ते उमेदवार निरर्ह ठरणार नाहीत याची सुनिश्चिती करण्यासाठी, त्या निवडून आलेल्या उमेदवारांना असे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदत वाढवून देण्याची तरतूद करणे). (अध्यादेश क्रमांक 21/2018 चे रूपांतर) (विधानसभेत पुर:स्थापित दि. २०.11.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 22/26/27.११.2018) (विधानसभेत संमत दि. 26. 11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 27/28.11.2018) (विधानपरिषदेत संमत 28.11.2018).

(४)     सन 2018 चे विधानसभा विधेयक  क्र.67.- .-   भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2018  (गृह विभाग) (विधानसभेत पुर:स्थापित दि. २०.11.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 22.११.2018). (विधानसभेत संमत दि. 22.11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 26/27/28.11.2018) (विधानपरिषदेत संमत 28.11.2018).

(५)     सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र.  62.- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, 2018 (नवीन विधेयक) (ग्रामपंचायत क्षेत्रांमधील दस्तांसाठी जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या १% अतिरिक्त मुद्रांक शुल्काच्या रकमेतून पुणे जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या ५० % पैकी पंचवीस टक्क्यांऐवढी रक्कम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला देण्याबाबत तरतूद करणे तसेच मुद्रांक शुल्क अधिनियमाखाली दस्तावर मुद्रांक शुल्क आकारणीबाबत सूट देण्यात आल्यास जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या अतिरिक्त मुद्रांक शुल्काबाबत तेवढीच सूट देणे) (ग्रामविकास विभाग) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 19.07.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 20.07.2018, 22.26.27/11/2018) (विधानसभेत संमत दि. 27. 11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 28.11.2018). (विधानपरिषदेत संमत 28.11.2018).

(६)     सन 2018 चे विधानसभा विधेयक  क्र.65.- महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठ (सुधारणा), विधेयक 2018 (कृषी,  पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स व्यवसाय विभाग ) (बॉम्बे पशु वैद्यकिय महाविद्यालय, मुंबई, याचे मुंबई पशु वैद्यकिय महाविद्यालय, मुंबई असे नामकरण करणे). (विधानसभेत पुर:स्थापित दि. 19.11.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 26/27.११.2018) (विधानसभेत संमत दि. 27. 11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 28.11.2018) (विधानपरिषदेत संमत 28.11.2018).

(७)     सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र. 60.-  महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा पध्दती (सुधारणा) विधेयक, 2018 पहिल्या महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद प्रथमत: घटित करतेवेळी योग्य व्यक्ती नामनिर्देशित करण्याचा अधिकार शासनास देण्याकरिता तरतूद करण्याबाबत (वैद्यकीय शिक्षण विभाग) (नवीन विधेयक) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 19.07.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 20.07.2018, 22/11/2018) (विधानसभेत संमत दि. 22.11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 26/27/28/29.11.2018) (विधानपरिषदेत संमत 28.11.2018).

(८)     सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र. 78.- महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे) आरक्षण विधेयक, 2018 (सामान्य प्रशासन विभाग)  (विधानसभेत संमत दि. 29.11.2018)  (विधानपरिषदेत संमत 29.11.2018).

(९)     सन २०१8 चे विधानसभा विधेयक  क्र. 68 .- महाराष्ट्र मूल्यवर्धित कर (सुधारणा) विधेयक, २०१८. (वित्त विभाग) (नव्याने निर्धारण पूर्ण करण्यासाठी, व्यापाऱ्यांच्या वर्गास तसेच निर्धारण प्राधिकाऱ्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी, निर्धारण कालावधी आणखी सहा महिने इतका वाढून देण्याकरिता उक्त कलम २३ च्या पोट-कलम (७) मध्ये सुधारणा.) (अध्यादेश क्रमांक 23/2018 चे रूपांतर) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 22.11.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 26/27.११.2018). (विधानसभेत संमत दि. 26. 11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 27/28/29.11.2018) (विधानपरिषदेत संमत 29.11.2018).

(१०) सन 2018 चे विधानसभा विधेयक  क्र.69 .-   महाराष्ट्र मूल्यवर्धित कर (दुसरी सुधारणा) विधेयक, 2018 (वित्त विभाग).  (महाराष्ट्र मुल्यवधीत कर कायद्यांतर्गत ऐच्छिक नोंदणीसाठी अनामत रकमेची तरतूद रद्द करणे व विहीत मूदतीत चालू बँक खात्याचा (Current Account)  तपशील सादर न करणाऱ्या व्यापाऱ्याचा नोंदणी दाखला रद्द करणे) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 22.11.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 26.११.2018).  (विधानसभेत संमत दि. 26. 11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 27/28/29.11.2018) (विधानपरिषदेत संमत 29.11.2018). 

(११) सन 2018 चे विधान सभा विधेयक क्र. 58.- महाराष्ट्र महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, 2018 (महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 73 (क) अन्वये स्थायी समितीच्या मान्यतेकरीता सादर करणे आवश्यक असलेल्या संविदांच्या सध्याच्या २५ लाख या वित्तीय मर्यादेत सुधारणा करून ती शासन वेळोवेळी अधिसूचनेद्वारे निश्चित करील एवढी असेल अशी तरतूद करणे) (नवीन विधेयक) (नगर विकास विभाग) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 18/07/2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 19/20.07.2018, 22.26.27/11/2018) (विधानसभेत संमत दि. 27. 11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 28/29.11.2018) (विधानपरिषदेत संमत 29.11.2018).

(१२) सन २०१8 चे विधानसभा विधेयक क्र. 59 .-  मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2018 (अधिसूचित महत्त्वपूर्ण नागरी परिवहन प्रकल्प राबविण्यात येणा-या मुंबई महानगरपालिका हद्दीतील मालमत्तेच्या हस्तांतरणावर आकारण्यात यावयाच्या मुद्रांक शुल्कात 1 % वाढ करून अशी वाढवलेली रक्कम महानगरपालिकेस अनुदान म्हणून देण्याकरिता नवीन कलम 149-फ दाखल करणे) (नवीन विधेयक) (नगर विकास विभाग) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 19.07.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 20.07.2018, 22.26.27/11/2018) (विधानसभेत संमत दि. 27. 11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 28/29.11.2018) (विधानपरिषदेत संमत 29.11.2018).

(१३) सन 2018 चे विधानसभा विधेयक  क्र.71.-   महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2018. (वित्त विभाग). (नवीन विवरण दाखल करण्याच्या पध्दतीची अंमलबजावणी करण्यासाठी  आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र वस्तु सेवा कर अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले होते. (अध्यादेश क्रमांक 22/2018 चे रूपांतर) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 22.11.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 26/27.११.2018) (विधानसभेत संमत दि. 27. 11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 28/29.11.2018) (विधानपरिषदेत संमत 29.11.2018).

(१४) सन 2018 चे विधानसभा विधेयक  क्र.72 .- महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक,  2018. (नगर विकास विभाग) (प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पात्र लाभधारकांना जागा भाडेतत्वार उपलब्ध करुन देणेबाबतची तरतुद करणेकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 यांमध्ये सुधारणा करणेकरिता विधेयक) (विधानसभेत पुर:स्थापित दि. २6.11.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 27.११.2018) (विधानसभेत संमत दि. 27. 11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 28/29.11.2018) (विधानपरिषदेत संमत 29.11.2018).

(१५) सन 2018 चे विधानसभा विधेयक  क्र. 73 .-औषधे व सौंदर्य प्रसाधने (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2018 (औषधद्रव्ये विभाग) (सदर कायदयाखालील औषधे, सौंदय प्रसाधने, आयुवेदिक, सिद्ध्‍ व युनानी औषधे यांच्याबाबतीतील अनुज्ञाप्ती रद्द किंवा निलंबित करणे किंवा अशा अनुज्ञप्ती मंजूरीचा अटीच्या उल्लंघनाबाबतीत द्रव्यदंड आकारणी करण्याच्या प्रयोजनांकरिता नियम करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्यासाठी विधेयक) पुर:स्थापित दि. 26.11.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 27.११.2018) (विधानसभेत संमत दि. 27. 11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 28/29.11.2018) (विधानपरिषदेत संमत 29.11.2018).

(१६) सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र. 38-  महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2018. (ज्या सहकारी संस्थेला भाग भांडवल, कर्ज सहाय्य किंवा जमीन या स्वरुपात शासनाचे सहाय्य मिळालेले आहे अशा संस्थेच्या मंडळावर शासनाचे दोन प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबत तरतूद) (सहकार विभाग) (अध्यादेश क्रमांक 15/2018 चे रूपांतर). (पुरःस्थापित दि. 04.07.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 09/10/11/12.07.2018) (विधानसभेत संमत दि. 12.07.2018) (विधान परिषदेत विचारार्थ दि. 13/16/17/18/19/20.07.2018, 20/22.11.2018) (विधानसभेत पुन्हा संमत  दि. 29.11.2018) (विधानपरिषदेत संमत ३०.11.2018).

(१७) सन 2018 चे विधानसभा विधेयक  क्र.74.-   महाराष्ट्र राष्ट्रीय  विधि विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2018 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग). (मुंबई उच्च न्यायालयने मुख्य न्यायमुर्ती यांची प्र. कुलपती म्हणून नियुक्ती करणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता राज्य शासनाच्या धोरणानुसार जागा राखुन ठेवण्यात येतील सुनिश्चीती करणे) (विधानसभेत पुरःस्थापित दि. 28.11.2018) (विधानसभेत संमत दि. 29.११.2018) (विधानपरिषदेत संमत ३०.11.2018).

(१८) सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र.76:- महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) विधेयक, 2018(विधानसभेत पुर:स्थापनार्थ दि. 28.11.2018) (विधानसभेत पुरःस्थापित  दि. 28.11.2018) (विधानसभेत संमत दि. 29.११.2018) (विधानपरिषदेत संमत ३०.11.2018).
(१९) सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र. 79- विजयभूमी विद्यापीठ, रायगड विधेयक, 2018 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग). (विधानसभेत पुर:स्थापित दि. 29.11.2018) (विधानपरिषदेत संमत ३०.11.2018)

(२०) सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र. 80- दिवाणी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) (सुधारणा) विधेयक, 2018 (विधि व न्याय विभाग). (विधानसभेत पुर:स्थापनार्थ दि. 30.11.2018) (दिवाणी प्रक्रिया संहितेचे कलम 9क वगळण्याच्या परिणामी व्यावृत्तीविषयक तरतुदी)  (विधानपरिषदेत संमत ३०.11.2018).

विधान सभेत प्रलंबित विधेयके
(१)        सन 2017 चे विधानसभा विधेयक क्र. 64 - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, 2017  राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घ्यावयाच्या निवडणुकांकरिता नियम करण्यासाठीचा कालावधी वाढविणे व प्रशासकास किंवा प्रशासकीय मंडळास निवडणुका घेण्यासाठी कालावधी वाढवून देणे यांकरिता तरतूद करणे. (अध्यादेश क्रमांक 2०/2017 चे रूपांतर) (पणन विभाग) विधानसभेत विचारार्थ दि. 20/21/22/२३/26/27/ 28.03.2018, दि. 19/20.07.2018, 28/29.11.2018)

(२)      सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र. 29- महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, 2018.(फौजदारीपात्र गैरवर्तनाचा अपराध केलेल्या लोकसेवकांची मालमत्ता सरकारजमा करण्याकरिता; आणि त्याच्याशी संबंधित किंवा तदानुषंगिक बाबीकरिता तरतूद करणे (पुरःस्थापित दि. 27.03.2018- विधानसभेत विचारार्थ दि. 28.03.2018/16/17/18/19/20.07.2018)

(३)      सन २०१8 चे विधानसभा विधेयक क्र. 34- हैदराबाद अतियात चौकशी (सुधारणा) विधेयक, 2018 (खिदमतमाश जमिनींचा कालानुरूप वापर करणे शक्य व्हावे यासाठी हैदराबाद अनियात चौकशी अधिनियम, 1952 च्या कलम ६ मध्ये सुधारणा करणेबाबत) (महसूल विभाग) (अध्यादेश क्रमांक 11/2018 चे रूपांतर). (पुरःस्थापित दि. 04.07.2018)(विधानसभेत विचारार्थ दि.                     )
(४)      सन २०१8 चे विधानसभा विधेयक  क्र. 70.-    महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक 2018. (सहकार वस्त्रोद्योग व पणन विभाग)  (गृहनिर्माण सहकारी संस्थाच्या निवडणुका वेळेत पार पडतील याची सुनिश्चिती करण्यासाठी, अशा निवडणुका विनाविलंब घेण्याकरिता नियमांद्वारे कार्यपध्दती विहित करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे घेण्याकरिता तरतूद करणे.) (अध्यादेश क्रमांक 2५/2018 चे रूपांतर) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 22.11.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 26/27/28.29.११.2018).

(५)    सन २०१8 चे विधानसभा विधेयक क्र. 36-  महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८  (पणन विभाग). (महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियम) अधिनियम, 1963 याच्या कलम 13(1)(ब) मध्ये बाजारक्षेत्रात व्यापारी व अडते संवर्गातून मतदार म्हणून अर्हता धारण करण्यासाठी लागणारा २ वर्षाचा लायसन धारण करण्याच्या कालावधी 1 महिन्यांहून कमी नसेल इतका आणि किमान 10,000 इतक्या रक्कमेचा व्यवहार असा बदल करण्यासाठी सुधारणा करण्याकरिता). (अध्यादेश क्रमांक 12/2018 चे रूपांतर) (पुरःस्थापित दि. 04.07.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 05/06/09/10/11/12/13/16/17/18.07.2018) (विधानसभेत संमत दि. 18.07.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 19/20.07.2018, 20/22.11.2018)  (विधानसभेत पुन्हा संमत करण्याकरीता दि.        ).

(६)        सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र.77:- महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, 2018. (विधानसभेत पुर:स्थापित दि. 29.11.2018) (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1961 च्या कलम 24अ च्या तरतुदीनुसार सहकार शिक्षण व प्रशिक्षण देण्याकरिता प्रशिक्षण निधीत अंशदान देण्याच्या संदर्भात त्या त्या सहकारी संस्थेचे स्वरूप लक्षात घेऊन अधिसूचित केलेल्या राज्य संघीय संस्था किंवा राज्य शिखर प्रशिक्षण संस्था यांना अंशदान देण्याकरिता तरतुदी).विधान परिषदेत प्रलंबित विधेयके
(१)    सन २०१8 चे विधानसभा विधेयक क्र.  61.-  महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2018 (व्यथित पालकांच्या गटाला शाळा व्यवस्थापनाने अथवा कार्यकारी समितीने घेतलेल्या फी-वाढीच्या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्याची संधी देण्याची तरतूद करण्याबाबत व अन्य अनुषंगिक सुधारणा)(नवीन विधेयक) (शालेय शिक्षण विभाग) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 19.07.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 20.07.2018, 26.11.2018) (विधानसभेत संमत दि. 26. 11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 27/28/29.11.2018).

मागे घेण्यात आलेली विधेयके
(१)    सन २०१8 चे विधानसभा विधेयक  क्र. 64 .-    महाराष्ट्र कृषि उत्पन्न व पणन (विकास व विनियमन) (तिसरी सुधारणा) विधेयक, 2018. (सहकार वस्त्रोद्योग व पणन विभाग)  (  पशुधनाच्या संबंधातील पणनाचे विनियमन करण्याकरिता तरतुदी; राष्ट्रीय नामांकित बाजारतळ व त्याच्याशी संबंधित आणि अनुषंगिक बाबींकरिता तरतुदी;विविध प्रकारचे बाजार स्थापन करण्यासंबंधात तरतुदी;बाजार उप-तळ म्हणून वखार, साइलो, शीतगृह, इत्यादीकरिता तरतुदी.) (अध्यादेश क्रमांक 24/2018 चे रूपांतर) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 19.11.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 20/22/26/27.११.2018) (विधानसभेत संमत दि. 27. 11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 28.11.2018). (दि. 09.07.2018 रोजी मागे घेण्यात आले).
00000