जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ‘महात्मा गांधी व जागतिक शांतता’ विषयावर कलाकृती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थितीमुंबई दि.2: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या  150 व्या जयंतीच्या वर्षाच्या निमित्ताने जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधील सुमारे  150 कलाकारांनी एकत्र येऊन महात्मा गांधी व जागतिक शांतताया विषयावर आपापल्या शैलीत कलाकृती सादर केली.  महात्मा गांधी यांच्या  150 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने जे.जे.स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनी एक आगळेवेगळे प्रदर्शन येथे आयोजित केले आहे. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज या प्रदर्शनाला भेट देऊन  विविध कलाकारांनी रेखाटलेली कला पाहिली.

महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून अनेक नामांकित कलावंत तसेच जे.जे. कला महाविद्यालयातील काही आजी-माजी विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते. या कलांकरामध्ये चित्रकार, शिल्पकार, आणि वस्त्रकलाकार यांनी महात्मा गांधी यांना आपल्या कलेतून आगळीवेगळी आदरांजली वाहिली.  चित्रकलेच्या माध्यमातून महात्मा गांधी यांचा संदेश जनमानसापर्यंत पोहचिवण्यात येत आहे, हे नक्कीच गौरवास्पद असल्याची प्रतिक्रिया श्री. तावडे यांनी यावेळी दिली.  जे.जे.स्कूल ऑफ आर्टसने आखलेल्या या उपक्रमाची प्रशंसा केली.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा