राजभवन येथे होणार महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेचे उदघाटन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई दि. 2: केंद्र शासनाचा औदयोगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास आणि उदयोजकता विभाग व महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित करण्यात आलेल्या स्टार्ट अप महाराष्ट्र यात्रेचे उदघाटन उदया दिनांक 3 ऑक्टोबर रोजी राजभवन येथून होणार आहे. राज्यपाल चे.विदयासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य उदयोग मंत्री सुरेश प्रभू, शिक्षणमंत्री विनोद तावडे, कौशल्य विकास आणि उदयोजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, कौशल्य विकास आणि उदयोजकता राज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना स्टार्ट अप विषयात योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि स्टार्टअप संदर्भातील विविध उपक्रमांचा महाराष्ट्रातील उद्योजकांना लाभ मिळण्यासाठी महिनाभर चालणाऱ्या 'महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजभवन येथून या यात्रेचे उदघाटन झाल्यानंतर ही यात्रा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पोहोचणार असून स्टार्ट अप यात्रा निमित्त्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्टार्ट अपसाठी आवश्यक त्या सुविधांनी उपयुक्त अशी स्टार्ट अप व्हॅन राज्यभरात फिरणार आहे. महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेची ग्रॅड फिनाले नागपूर येथे होणार आहे. नवकल्पना घेऊन येणाऱ्या व्यक्तींना तथा उदयोजकांना स्टार्ट अप इंडिया अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेत सहभागी होण्यासाठी किंवा सादरीकरण करण्यासाठी  www.startupindia.gov.in किंवा  www.msins.in वर याबाबत नोंदणी करता येईल.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा