पोलीस कर्मचा-यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुठा उजवा कालवा दुर्घटनेच्या वेळी नागरिकांना मदत
पुणे दि.   : मुठा उजवा कालवा फुटीच्या दुर्घटनेच्यावेळी आपदग्रस्तांना तात्काळ मदत करुन त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या निलम भरत गायकवाड आणि संतोष लक्ष्मण सुर्यवंशी या पोलीस कर्मचा-यांचा प्रशस्तीपत्र देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. 
      
या पोलीस कर्मचाऱ्यांनी, मुठा कालवा फुटीच्या दुर्घटनेच्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून, कर्तव्यभावनेने लहान मुले व त्यांच्या मातांना पाण्याच्या प्रवाहाबाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले होते. तसेच सात व आठ नागरिकांना दोराच्या सहाय्याने पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले होते. त्यामुळे मनुष्यहानी झाली नाही. या त्यांच्या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
       
यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, वायुदलाचे एअर कमोडोर के.व्ही.एस. नायर, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा