आनंदराव देवकते यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 12: माजी मंत्री आनंदराव देवकते यांच्या निधनाने राजकारणासोबतच सहकार आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. देवकते यांनी सरपंच पदापासून आपला राजकीय प्रवास सुरु केला होता. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून योगदान देताना त्यांची सर्वसामान्य जनतेशी अतूट बांधिलकी निर्माण झाली होती. सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य होते. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ राजकीय नेता हरपला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा