'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि.१५: माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात राज्यातील कायदा व सुव्यवस्थाया  विषयावर गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. श्रीमती अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.


राज्यात सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे नियोजन, अफवांना बळी पडून होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांवर नियंत्रणासाठी पोलीस विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर करण्यात येणारी कारवाई, राज्यातील महिला, बालके आणि वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी  गृह विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, सामाजिक ऐक्य व शांतता राखण्यासाठी जिल्हा स्तरावर तसेच गाव स्तरावर केले जाणारे प्रयत्न, ट्रान्सफॅार्म महाराष्ट्र  संकल्पना याबाबतची माहिती श्री. गुप्ता यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा