‘दिलखुलास’मध्ये सोमवारी गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 13 : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात 'रत्नागिरी जिल्ह्याचा विकास' या विषयावर गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांची मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. 15 आणि मंगळवार दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन विकास, गणपतीपुळे विकास आराखड्यास मान्यता, एस. टी. बस स्थानके स्वच्छता, रत्नागिरी आणि दापोली येथे ऍक्टिव्हिटी सेंटर उभारण्याचा उद्देश, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्ह्यात उभारण्यात येणारे रोप वे, रत्नागिरी भूषण पुरस्कार, पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना याबाबतची माहिती श्री. वायकर यांनी दिलखुलास कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा