दिलखुलास कार्यक्रमात सोमवारी ठाणे जिपचे सीईओ विवेक भीमनवार यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 6 : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास  कार्यक्रमात  ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणीया विषयावर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांची मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. 8 आणि  मंगळवार दि. 9 ऑक्टोबर रोजी  सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.


ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी, ग्रामीण भागात घर बांधण्याचे उद्दिष्ट, योजनेच्या प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांचा उपयोग, संपूर्ण लक्षांक साधण्यासाठीचे नियोजन, डिजिटल क्रांती, स्वयंपूर्ण शाळा उपक्रम, ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा योजना, अभिलेख वर्गीकरण आणि डिजिटल मोहिमेचे नियोजन तसेच ठाणे जिल्हा परिषदेतील कामकाजात सकारात्मक बदल याबाबतची माहिती श्री. भीमनवार यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा