स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

 

मुंबई, दि. ३ : थोर स्वातंत्र्य सेनानी व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे  यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आज अभिवादन
 केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य श्रीकांत देशपांडे व दत्तात्रय सावंत तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा