उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे पुणे विमानतळावर स्वागत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


         
पुणे दि. २ : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथील लोहगाव विमानतळावर आगमन झाले.
         
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यांचे स्वागत केले. पुणे येथील एम आय टी विश्वशांती विद्यापीठाच्या समारंभास उपस्थित राहण्यासाठी पुण्यात उपराष्ट्रपती महोदय यांचे आगमन झाले.
         
यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, एअर कमोडोर के.व्ही.एस. नायर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) सुनील थोरवे यांनीही उपराष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा