ज्येष्ठ साहित्यिक कविता महाजन यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. २७: ज्येष्ठ साहित्यिक कविता महाजन यांच्या निधनाने मराठी  साहित्यात स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख प्रस्थापित करणारी एक महत्त्वाची  लेखिका आपण गमावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित श्रीमती महाजन यांनी  मराठी कादंबरीच्या प्रवाहात स्वत:चा वेगळा असा ठसा उमटविला होता. कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्‌मय अशा साहित्याच्या विविध प्रकारांना स्पर्श करणारे त्यांचे सशक्त लेखन मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारे होते.  त्यांच्या निधनाने आपण एक चांगल्या स्तंभलेखिका आणि समाजजीवनावरच्या प्रभावी भाष्यकार गमावल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा