राज्याच्या किनारपट्टीवरील पाच गावांमध्ये मंगळवारी त्सुनामीबाबत रंगीत तालीम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि 1 : राज्याच्या किनारपट्टीवरील पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात त्सुनामीच्या वेळी करण्यात येणाऱ्या तयारीसंदर्भात मंगळवारी, 4 सप्टेंबर 2018 रोजी रंगीत तालीम ( Mock Drill) घेण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


राष्ट्रीय आपत्ती  व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली आणि इन्कॉईस, हैद्राबाद यांच्या सहकार्याने देशाच्या पश्चिम किनार पट्टीवरील राज्यांमध्ये ही रंगीत तालीम होणार आहे. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील येडवन, रायगड जिल्ह्यातील बोर्ली, रत्नागिरी  जिल्ह्यातील पजपांडरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामडूल आणि ठाणे जिल्ह्यातील पाली या पाच गावांमध्ये ही रंगीत तालीम होणार आहे. त्सुनामी संदर्भातील तयारी आणि घ्यावयाची  दक्षता हा या रंगीत तालमीचा उद्देश आहे. ही रंगीत तालीम संबंधित गावातील नागरिक, सर्व शासकीय व अशासकीय संस्था व कार्यालये यांच्या सहकार्याने त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडून घेण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा