'दिलखुलास'मध्ये उद्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे एमडी विवेक सावंत यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. २७ : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास  कार्यक्रमात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांची मुलाखत घेण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. २८ आणि शनिवार दि. २९ सप्टेंबर रोजी  सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदिका शिल्पा नातू यांनी ही मुलाखत घेतली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १० ऑक्टोबर २०१७ रोजी  महालाभार्थी वेबपोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल)  यांच्या संयुक्त विद्यमाने हे महालाभार्थी वेब पोर्टल विकसित करण्यात आले. डिजिटल माध्यमातून सर्वसामान्यांना शासकीय योजनांची माहिती क्षणात होण्यासाठी महालाभार्थी वेबपोर्टल तयार करण्यात आले. या वेबपोर्टलच्या निर्मितीत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची भूमिका, वेबपोर्टलचा पत्ता, नोंदणी पद्धत, महालाभार्थी प्रेरक संकल्पना याविषयांची माहिती श्री. सावंत यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा