'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. २७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची 'सर्वांसाठी घरे' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.


बी.डी.डी चाळींचा पुनर्विकास, गिरणी कामगारांना हक्काची घरे, कोळीवाडे व गावठाणे विकासासाठी विकास नियोजन आराखडा, 'सर्वांसाठी घरे' योजना, नागरी भागातील झोपडपट्ट्यांच्या व  जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनाचे धोरण, संक्रमण शिबिरातील रहिवाशांना घरे देण्याकरिता शासनाचे धोरण याविषयी सविस्तर माहिती जय महाराष्ट्र कार्यक्रमात राज्यमंत्री श्री. वायकर यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा