चीनच्या कौन्सिल जनरलनी घेतली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. २३ : चीनचे मुंबई येथील कौन्सिल जनरल टँग गोचाई यांनी गुरुवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची सदिच्छा भेट घेतली. दोन्ही देशातील राजकीय, आर्थिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली.दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून सलोख्याचे संबंध आहेत. इंडो-चायना फोरमच्या वतीने दोन्ही देश विविध कार्यक्रम घेत असतात. त्यातून कला संस्कृती तसेच व्यापारवृद्धीला प्रोत्साहन दिले जाते. भविष्यात दोन्ही देशांना तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रात काम करण्याची  गरज उद्योगमंत्री  श्री. देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. डिसेंबर महिन्यात चीनमध्ये वार्षिक कला, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी भारतीयांनी आपल्या वस्तू विक्री तसेच प्रदर्शनासाठी ठेवाव्यात, असे आवाहन चीनचे कौन्सिल जनरल  टँग गोचाई यांनी यावेळी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा