हातमाग विणकर जनगणना नोंदणीसाठी आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. २७ : चौथी राष्ट्रीय हातमाग विणकर जनगणना २०१७, देशात आयोजित करण्यात आलेली आहे. या गणनेचे काम महाराष्ट्र राज्यामध्ये अंतिम टप्प्यात असून सर्व हातमाग विणकर तसेच संलग्न विणकर/मजूर यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, या जनगणनेत ज्या विणकरांचा समावेश झालेला नसेल त्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी किंवा आपल्या नजीकच्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय अथवा प्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोद्योग) यांचे कार्यालयाशी दि. ३० ऑगस्ट २०१८ पूर्वी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग यांनी केले आहे.

ऑनलाईन नोंदणीसाठी www.handloomcensus.org हे संकेतस्थळ आहे. तसेच उपसंचालक कार्यालयाचा पत्ता प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, मुंबई, सातवा मजला, चरई टेलिफोन एक्स्चेंज बिल्डींग, मावळी मंडळ रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०१, व दू.क्रं. ०२२-२५४०५३६३असा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा