'आपलं मंत्रालय' मासिकाचा ऑगस्ट २०१८ चा अंक प्रकाशित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 28 : 'आपलं मंत्रालय' या मासिकाच्या ऑगस्टच्या अंकाचे प्रकाशन अपर मुख्य सचिव (वित्त विभाग) यू.पी.एस मदान  यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे करण्यात आले. या अंकाचे अतिथी संपादक श्री. मदान आहेत. यावेळी  संचालक  अजय अंबेकर, शिवाजी मानकर, संपादक सुरेश वांदिले,  विभागीय जनसंपर्क अधिकारी डॉ. सुरेखा मुळे, कार्यकारी संपादक मीनल जोगळेकर, सहायक संपादक मंगेश वरकड उपस्थित होते.
    

या अंकात राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग, बालसंगोपन रजा, माहितीचा अधिकार आणि जनहित याचिका, कविता, विनोद आदी विषयांचा समावेश करण्यात आला असल्याने हा अंक कर्मचाऱ्यांसाठी वाचनीय झाला आहे. मंत्रालय परिसरातील घडामोडींचा यात  समावेश करण्यात आला आहे. माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लेख या अंकाचे वैशिष्ट्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा