एबीपी माझा सन्मान पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गौरव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 30 : एबीपी माझा वृत्तचित्रवाणी समूहाच्या वतीने देण्यात येणाऱ्या माझा सन्मान पुरस्कार प्रदान सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एबीपी माझा समूहाचे कार्यकारी  संचालक अतिदेब सरकार, वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर आदी उपस्थित होते.


सोहळ्यात क्रिकेटपटू पृथ्वी शॉ, स्वच्छता दूत अफरोज शाह, जलसंधारण क्षेत्रात कार्यरत जलदूत डॉ.अविनाश पोळ, कर्करोग शल्यविशारद डॉ. शैलेश पुणतांबेकर, अभिनेत्री अमृता खानविलकर, गायक, संगीतकार पंडित शौनक अभिषेकी, चित्रपट निर्माता दिग्दर्शक मधुर भांडारकर, जैवइंधन क्षेत्रातील उद्योजक प्रमोद चौधरी, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना माझा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी श्री. खांडेकर यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्री. ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत विविध प्रश्नांवर श्री. फडणवीस आणि श्री. ठाकरे यांनी दिलखुलास आणि हजरजबाबी उत्तरे देऊन रंगत आणली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा