केरळ पूरग्रस्तांच्या मदतकार्याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन आणि वैद्यकीय पथकाचे ऑस्ट्रेलियन सदनात कौतुक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 28- केरळ येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतः वैद्यकीय पथकासह जाऊन मदतकार्यात सहभागी झाल्याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन आणि त्यांच्या पथकाचे ऑस्ट्रेलियन सदनात कौतुक करण्यात आले.


ग्रीनवे, ऑस्ट्रेलियाच्या पार्लमेन्ट सदस्य मिशेल रोलॅन्ड यांनी केरळमध्ये उद्भवलेल्या भीषण पुरानंतर मदतकार्याचा आढावा घेताना महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी केलेल्या मदतकार्याचे कौतुक केले. त्याशिवाय महाराष्ट्राच्या वैद्यकीय पथकाने केलेल्या कामगिरीचादेखील संदर्भ त्यांनी यावेळी दिला. एखाद्या मदतकार्याबद्दल विदेशातील विधीमंडळ किंवा पार्लमेन्टमध्ये दुसऱ्या देशातील राज्याच्या एखाद्या मंत्र्यांचे कौतुक होण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा