'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


 
मुंबई, दि. २७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची 'समतोल आर्थिक विकास' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या मंगळवार दि. २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक शैलेश पेठे यांनी घेतली आहे.


शासनाने रोजगार निर्मितीचा आढावा व रोजगार संधी निर्मितीसाठी तयार केलेला कृती आराखडा, राज्याचा समतोल विकास करण्यासाठी सुरू असलेले महाराष्ट्र मानव विकास मिशनचे कामकाज, चांदा ते बांदा पथदर्शी योजना, मुद्रा योजनेची राज्यात सुरू असलेली अंमलबजावणी तसेच महाराष्ट्राचे उद्योगातील योगदान याबाबतची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा