जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली तंबाखू विरोधी शपथ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. ३१ : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज मंत्रालयात तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना शपथ दिली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत उपस्थित होते.

मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामावर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सर्वप्रथम दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तंबाखू विरोधी शपथेचे मुख्यमंत्र्यांनी वाचन केले. घर, परिसर, कार्यालय, मंत्रालय आणि संपूर्ण महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याची शपथ सर्वांनी घेतली.


यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, संचालक डॉ. संजीव कांबळे, सहसंचालक डॉ. साधना तायडे आदींसह दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
०००००
अजय जाधव..३१.५.१८    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा