जयकुमार रावल यांनी घेतली केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची भेट; खान्देशात सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनवी दिल्ली : खान्देश विभागात सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र मिळावे, अशी मागणी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना केली.

श्री.रावल यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन खान्देशात सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबतची मागणी केली.  

खान्देश हा विभाग आदिवासी बहुल असून या भागात  धुळे, नंदुरबार, जळगाव हे जिल्हे मोडतात. या भागातील तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र मिळावे, अशी मागणी श्री.रावल यांनी श्री.भामरे यांच्याकडे केली.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती श्री.रावल यांनी दिली.श्री.रावल यांनी आज केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचीही त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.

घारापुरी बेट व इगतपुरी वेलनेस हब ठरणार पर्यटकांचे आकर्षण - पर्यटनमंत्री जयकुमार रावल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


नवी दिल्ली : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध घारापुरी बेट व नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी  वेलनेस  हबला देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभाग कार्यरत असून, ही स्थळे पर्यटकांचे खास आकर्षण ठरतील, असा विश्वास राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केला. 

श्री.रावल यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री.रावल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान, श्री.रावल यांनी पर्यटन विभागाच्यावतीने  सुरु असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली.
                                    

घारापुरी बेटांवर ८ जून रोजी पर्यटकांचा महाकुंभ 
पर्यटन विभागाच्यावतीने नव-नवीन पर्यटन स्थळे विकसित करून ते जगासमोर मांडण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत.  या उपक्रमांतर्गत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या घारापुरी बेटाला देश-विदेशातील पर्यटकांसमोर मांडण्यासाठी ८ जून २०१८ रोजी विशेष आयोजन करण्यात आल्याचे श्री. रावल यांनी सांगितले. राज्य शासनाच्या प्रयत्नाने घारापुरी बेटावर नुकतीच वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्यावतीने पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बेटावरील जगप्रसिद्ध एलिफंटा गुंफा येथील समुद्र, पहाड, जंगल आदींचा पर्यटकांना आनंद घेता यावा व या बेटांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून देण्यासाठी एअर बीएनबीया जगविख्यात कंपनी सोबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सामंजस्य करार केला आहे. याचाच भाग म्हणून  ८ जून २०१८ रोजी घारापुरी बेटावर देश -विदेशातील  पर्यटकांसाठी पर्यटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


इगतपुरी येथे वेलनेस हब 
देश-विदेशातील पर्यटकांना एकाच ठिकाणी आयुर्वेद, युनानी, योगा,रेकी,ॲक्युप्रेशर आदी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्हयातील इगतपुरी येथे वेलनेस हब उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री.रावल यांनी दिली. पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने १०० एकरावर हे वेलनेस हबउभारण्यात येणार असून यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्राकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री.रावल यांनी वाहिली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त श्री.रावल यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकरकांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

रायगडला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यासाठी महाराष्ट्राची केंद्रासोबत भागीदारी - पर्यटनमंत्री जयकुमार रावल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


नवी दिल्ली, दि. ३१ : रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासनासोबत भागीदारी करणार असल्याची, माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

श्री. रावल यांनी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांची भेट घेतली. यावेळी रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यासंदर्भात चर्चा झाली.

महाराष्ट्रातील जनतेसाठी रायगड किल्ला अतिशय महत्त्वाचा आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जगभर मांडण्यासाठी या किल्ल्याचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासनासोबत मिळून काम करणार असल्याचे श्री. रावल यांनी सांगितले.

केंद्र शासनाने रायगडच्या नूतनीकरणासाठी पहिला टप्प्याचा निधी म्हणून 60 कोटी रूपये दिलेले आहेत.  महाराष्ट्रातील  किल्ले हे भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतात. भारतीय पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र शासन यात सामंजस्य ठेवून रायगड किल्ल्याचा विकास करण्यात येईल, अशी चर्चा आजच्या बैठकीत झाल्याची, माहिती श्री. रावल यांनी आज दिली.

औरंगाबाद येथील जगप्रसिद्ध अंजठा-वेरूळ लेणी बघण्यासाठी देशी-विदेशी  पर्यटक येतात. येथील तिकीट केंद्राची जागा बदलून हे केंद्र  इंडो-जपान केंद्रात सुरू करण्यात यावे, अशी मागणी आज राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे केली.

भारत आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने अंजठा-वेरूळ लेण्यांजवळ इंडो-जपान केंद्र उभारण्यात आलेले आहे. या केंद्रालाही पर्यटकांनी भेट द्यावी यामागचा हा उद्देश असल्याचे सांगितले. केंद्रीय सांस्कृतिकमंत्री यांनी यावर सकारात्मकता दर्शविल्याचे, श्री. रावल यांनी सांगितले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. अशोक ढवण यांची नियुक्ती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. ३१ : राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी आज डॉ. अशोक श्रीरंगराव ढवण यांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली.

डॉ. अशोक ढवण सध्या बदनापूरजिल्हा जालना येथील कृषी महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य पदावर काम करीत असून त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी अथवा ते वयाची ६५ पूर्ण करेपर्यंतयापैकी जे अगोदर होईल तेकरण्यात आली आहे.

विद्यमान कुलगुरू बी. वेंकटेश्वरुलू यांचा कार्यकाळ आज संपत आहे.
डॉ. अशोक ढवण यांनी एम.एससी. (कृषी) तसेच भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र या विषयात  पीएचडी प्राप्त केली असून त्यांना अध्यापनप्रशासन व संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती.

सेवानिवृत्तीनिमित्त सहायक संचालक विष्णू काकडे यांना निरोप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबईदि. ३१ :    माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात विविध पदांवर २९ वर्षे सेवा बजावल्यानंतर विष्णू काकडे हे आज सहायक संचालक (माहिती) या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिं यांच्या हस्ते पुष्पगुच्छशालश्रीफळ देऊन श्री.काकडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक (प्रशासन) अजय अंबेकरसंचालक (माहिती) शिवाजी मानकर यांच्यासह महासंचालनालयातील अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

श्री. काकडे यांनी यापूर्वी रायगड येथे दोन वर्षे माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यांनी रायगड तसेच पालघर येथील जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील सांभाळला आहे. सध्या ते मंत्रालयातील विभागीय संपर्क कक्षात सामाजिक न्यायमंत्रीपाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री यांचे विभागीय संपर्क अधिकारी म्हणून काम पाहत होते.

अजिंठा-वेरुळ येथे २२ ते २५ ऑगस्टदरम्यान जागतिक बुद्धिस्ट परिषदेचे आयोजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

पर्यटनमंत्री  जयकुमार रावल यांची माहितीनवी दिल्ली, दि. ३१ : जगप्रसिद्ध अजिंठा व वेरुळ येथे  दिनांक २२ ते २५ ऑगस्ट २०१८ दरम्यान जागतिक बुद्धिस्ट परिषद होणार असल्याची माहिती  महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री  जयकुमार रावल यांनी आज दिली.

येथील परिवहन भवनात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ए.के. अल्फाँस यांची आज श्री. रावल यांनी भेट घेतली. बैठकीनंतर श्री. रावल यांनी महाराष्ट्रात प्रथमच जागतिक बुद्धिस्ट परिषद होणार असल्याचे सांगितले. ही परिषद यावर्षी  दिनांक २२ ते २५ ऑगस्टदरम्यान युनेस्कोचा दर्जा प्राप्त असलेल्या औरंगाबाद येथील अंजिठा-वेरूळ लेण्यांच्या ठिकाणी होणार असल्याचे सांगितले.

यापूर्वी जागतिक बुद्धिस्ट परिषद ही उत्तर प्रदेश आणि बिहार येथे होत असे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्राला ही संधी प्रथमच मिळाली असल्याचे  श्री. रावल म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक बुद्धिस्ट परिषदेसाठी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.

जागतिक बुद्धिस्ट परिषदेत जगातील बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधित्व असेल. किमान २५ राष्ट्रे या परिषदेत सहभागी होतील असे श्री. रावल यांनी सांगितले. या जागतिक परिषदेनिमित्त महाराष्ट्राला आदरातिथ्य करण्याची संधी मिळेल, यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचेही श्री. रावल म्हणाले.

इचलकरंजीला वारणा पाणी योजनेतून पाणी मिळणार - चंद्रकांत पाटील यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
वारणा पाणीपुरवठा योजना आणि विरोधी कृती समितीत तोडगा


मुंबई, दि. ३१ : वारणा पाणीपुरवठा योजनेसंबंधी इचलकरंजी शहर वारणा पाणीपुरवठा योजना आणि विरोधी कृती समितीची संयुक्त बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली. या बैठकीत इचलकरंजीसाठी वारणा योजनेतून पाणी देण्याचा तोडगा सर्वानुमते काढण्यात आला. तसेच पाणी वाटपाच्या संघर्षातून दानोळीतील ग्रामस्थांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी मान्य करण्यात आली.

दानोळी जवळच्या कृष्णा-वारणा नदी संगमातून इचलकरंजीला पाणी देण्याचा तोडगा सर्वानुमते काढण्यात आला. यासाठी पाटबंधारे विभागाच्या समितीकडून फेर सर्वेक्षण करुन, अहवाल सादर करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तसेच, इचलकरंजीतील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील गळती दुरुस्त करण्यासाठी तात्काळ काम हाती घेण्याच्या सूचनाही नगरपालिकेला देण्यात आल्या. पंचगंगेतील दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

वारणा पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमापूर्वी झालेल्या गैरप्रकाराविरुद्ध पोलीस प्रशासनाकडून १६०० जणांवर गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी वारणा कृती समितीने केली. ही मागणी मान्य करुन दाखल गुन्हे तात्काळ मागे घेण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

या बैठकीला पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, खासदार राजू शेट्टी, आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील, माजी मंत्री विनय कोरे, महादेव धनवडे, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस. चहल, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक आदी यावेळी उपस्थित होते.

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली तंबाखू विरोधी शपथ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. ३१ : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज मंत्रालयात तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना शपथ दिली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत उपस्थित होते.

मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामावर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सर्वप्रथम दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तंबाखू विरोधी शपथेचे मुख्यमंत्र्यांनी वाचन केले. घर, परिसर, कार्यालय, मंत्रालय आणि संपूर्ण महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याची शपथ सर्वांनी घेतली.


यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, संचालक डॉ. संजीव कांबळे, सहसंचालक डॉ. साधना तायडे आदींसह दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
०००००
अजय जाधव..३१.५.१८    

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनवी दिल्ली, दि. ३१ :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
 
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर निवासी आयुक्त समीर सहाय यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी  कर्मचाऱ्यांनीही  यावेळी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.महाराष्ट्र परिचय केंद्रात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह यावेळी कार्यालयात उपस्थित अभ्यागत   कर्मचा-यांनीही  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

१ जून ते ३१ जुलैदरम्यान सागरी मासेमारीवर बंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. ३१: पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी  पोषक वातावरण असल्याने दि. १ जून ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात व भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रापर्यंत (इइझेड) मासेमारी बंदी घोषित करण्यात आली  आहे.

मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मत्स्य साठ्याचे जतन, खराब तसेच वादळी हवामानामुळे  मच्छिमारांची जीवित व वित्त हानी यांचे रक्षण करणे तसेच शाश्वत मच्छीमार व्यवस्थापनाच्या हेतूने तसेच केंद्र शासनाच्या २२ फेब्रुवारी २०१८ च्या आदेशानुसार ही मासेमारी  बंदी घोषित करीत असल्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे यांनी जाहीर केले आहे.
0000

सचिन गाढवे/वि.सं../दि.31.05.2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून इलेक्ट्रिक कारचे लोकार्पण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. ३१ : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराला टक्कर देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक व झूम कार अर्थात चार्जिंगवरील व बॅटरीवरील कार गाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री डॉ. हर्षवर्धन, युनायटेड नेशनमधील पर्यावरणचे कार्यकारी संचालक एरिक सोलहेम, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, महिंद्रा ॲन्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा, व्यवस्थापकीय संचालक डॉ.गोयंका, महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेशबाबू, झूम कारचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रेक मॉरन, परिवहन आयुक्त शेखर चन्ने आणि अभिनेत्री दिया मिर्झा आदींची उपस्थिती होती.

प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोपांना पाणी घालण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडा दाखवून कारचे लोकार्पण झाले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह व सामान्य प्रशासनचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे इलेक्ट्रिक गाड्यांची चावी सुपूर्द करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह प्रमुख पाहुण्यांनी इलेक्ट्रिक कारमधून गेट वे ऑफ इंडिया परिसरात फेरफटका मारला.


ईईएसएल (एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिस लिमिटेड), टाटा मोटर्स व महिंद्रा ॲन्ड महिंद्रा यांच्या सहकार्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत.

सार्वजनिक वाहतुकीसाठी वीजेवरील वाहनांचा वापर वाढवणार - मुख्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

ई व्हेइकलच्या वापर वाढविण्यासाठी राज्य शासनाचे पाच महत्त्वाचे करार


मुंबई, दि. ३१ : वीजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले असून या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय पर्यावरण, वन मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र शासन आणि टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा व इइएसएल या कंपन्यांसोबत पाच महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. पुढील काळात शासकीय वापरासाठीची तसेच महानगरांमधील सार्वजनिक वाहतुकीसाठी ई व्हेईकलचा वापर वाढविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी केली.

राज्य शासनाच्या वीजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई व्हेईकल) वापर करण्यासंदर्भातील धोरणाच्या अनुषंगाने आज राज्य शासनाने शासकीय कार्यालये, सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक सेवांमध्ये ई व्हेइकलचा वापर,  चार्जिंग केंद्रे उभारणे आदीविषयी सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे (यूएनइपी) कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम आदी उपस्थित होते.


वीजेवरील वाहनांच्या वापरासाठी राज्य शासनाचे सामंजस्य करार
महिंद्रा समूह व उद्योग विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल व महिंद्रा ॲण्ड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका यांनी स्वाक्षऱ्या केल्या. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ही चाकण येथील प्रकल्पात वीजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या उत्पादनासाठी, उत्पादन क्षमतेत वाढ करणार आहे. तसेच या वाहनांसाठी लागणारे सुटे भाग तयार करणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा व परिवहन विभाग यांच्यात झालेल्या करारावर डॉ. गोयंका व प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार विविध सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्थेसाठी इलेक्ट्रिक कार पुरविण्यासाठी महिंद्रा कंपनी शासनासोबत सहकार्य करणार आहे. परिवहन विभागाने टाटा मोटर्सबरोबर राज्य शासनाला एक हजार इलेक्ट्रिक वाहने पुरविण्यासंदर्भात आज करार केला. या करारानुसार टाटा मोटर्स ही टाटा पॉवरच्या सहकार्याने वीजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी राज्यामध्ये शंभर चार्जिंग केंद्रे उभारणार आहे. या करारावर टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक ग्युंटेर बुश्चेकव प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

एनर्जी इफिशियन्सची सर्व्हिसेस लिमिटेड (इइएसएल) यांच्याबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग व सामान्य प्रशासन विभागाने सामंजस्य करार केला आहे. इइएसएल ही सार्वजनिक बांधकाम विभाग व सामान्य प्रशासन विभागाला वीजेवर चालणाऱ्या कार तसेच या वाहनांसाठी चार्जिंग सुविधा पुरविणार आहे. या करारांवर इइएसएलतर्फे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार व राज्य शासनामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह व सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

यावेळी निधी पुरवठ्यासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम (यूएनइपी) व इइएसएल यांच्यात करार झाला. यानुसार राज्यात वीजेवर चालणारी वाहनांच्या वापराचा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम पर्यावरण विभाग इइएसएलला निधी पुरविणार आहे.

वाहतूक क्षेत्रातील बदलासाठी राज्य शासन सज्ज - मुख्यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील दळणवळण क्षेत्रात मोठे बदल करण्यासाठी आजचे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. सुलभ, सुयोग्य तसेच पर्यावरणपूरक दळणवळण व शाश्वत वाहतूक व्यवस्था वाढविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. त्यासाठी प्रदूषणमुक्त अशा वीजेवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराचे धोरण (ई व्हेइकल पॉलिसी) तयार केली आहे. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देशात होत असलेले मोठे बदल स्वीकारण्यासाठी राज्याने पुढाकार घेतला असून आम्ही वेगाने पुढे जाऊ. आता ही सुरुवात असून आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. 

राज्यातील विशेषतः मुंबई, पुणे व नागपूर सारख्या महानगरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वीजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार आहे. तसेच शासकीय कार्यालयांसाठी वीजेवर चालणारी वाहने वापरण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सन 2030 पर्यंत वीजेवर चालणारी वाहने आणणार- डॉ. हर्षवर्धन
राज्य शासनाने पर्यावर वाचविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अभिनंदन करून केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, वीजेवर चालणारी वाहने व त्यासाठीची सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला आहे. सन 2030 पर्यंत सर्व वाहने ही वीजेवर चालणारी आणण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. मिशन इनोव्हेशन अंतर्गत केंद्र शासनाने विविध संशोधनावर मोठा भर दिला असून त्यासाठी विविध विद्यापीठे व संस्थांना प्रोत्साहन दिले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वीजेवर चालणाऱ्या वाहनांची आवश्यकता आहे. ही वाहने स्वस्त, सहज परवडणारी असून या वाहनांसाठी वीजपुरवठाही सुलभपणे करण्यात येणार आहे.

पर्यावरण वाचविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ व केंद्र शासन मोहीम राबवित असून सर्वांनी पर्यावरण वाचविणे हे आपले नैतिक कर्तव्य मानून यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. हर्षवर्धन यांनी केले.

वीजेवर चालणाऱ्या वाहनांमुळे रोजगार संधी वाढणार - इरिक सोल्हेम
संयुक्त राष्ट्र संघ- पर्यावरणचे कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम म्हणाले, प्रदूषणापासून देश व पर्यावरणाच्या रक्षणासाठी याप्रकारची पावले उचलणे आवश्यक ठरणार आहे. यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने पुढाकार घेतला आहे. वीजेवर चालणारी वाहने ही पुढील काळाची आवश्यकता ठरणार असून ती स्वस्त व पर्यावरणपूरक आहेत. यामुळे या क्षेत्रात रोजगार संधी व आर्थिक भरभराट होणार आहे.

यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी पर्यावरण रक्षणासाठी महिंद्रा कंपनी नेहमीच सहकार्य करणार असल्याचे सांगितले. टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक प्रविर सिन्हा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आदी यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांनी केला वीजेवर चालणाऱ्या बसमधून मंत्रालय ते गेट वे प्रवास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्रालयात उभारण्यात आलेल्या ई चार्जिंग सेंटरचे उद्घाटन केले. त्यानंतर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री महोदयांनी वीजेवर चालणाऱ्या बेस्टच्या बसमधून मंत्रालय ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर प्रवास केला. यावेळी आमदार राज पुरोहित, संयुक्त राष्ट्र संघ- पर्यावरणचे कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम, महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा आदींनी या बसमधून प्रवास केला.
०००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/31.5.2018

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही  मुलाखत उद्या, शुक्रवार दिनांक १  जून  रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक युवराज मोहिते यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यात दुधाचे उत्पादन आणि दुधाळ पशुंच्या दुग्धोत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी शासनाकडून घेण्यात आलेले निर्णय, दुधाळ जनावरांची वाटप योजना, राज्यातील कुक्कुटपालन तसेच अंडी उत्पादन वाढावे यासाठी शासनाकडून  राबविण्यात येत असलेल्या आर्थिक सहाय्याच्या योजना, ‘चारायुक्त शिवार’, सघन कुक्कुट विकास योजना, ‘कामधेनू दत्तक ग्राम योजनाकाय आहे, विदर्भ, मराठवाड्यासाठी राबविण्यात येणारे विशेष प्रकल्प आदीविषयी सविस्तर माहिती श्री. जानकर यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.