मराठवाडा रेल्वे कोच निर्मिती कारखान्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते भूमिपूजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



लातूर, दि. ३१ :-  मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा उद्योग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण रेल्वे कोच निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते हरंगुळ एमआयडीसी क्षेत्रात झाले.

यावेळी रेल्वेमंत्री पीयुष गोयल, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, राज्याचे कामगार कल्याण, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याणमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते.



रेल्वे कोच कारखान्याच्या भूमिपूजनानंतर कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पीयुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर सुरेश पवार, आमदार सर्वश्री. अमित देशमुख, त्र्यंबक भिसे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील, सुजितसिंह ठाकूर, मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर, महानगरपालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, रेल्वे मंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ. प्रविण गेडाम, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी  इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा