माहिम चौपाटीचे सुशोभीकरण करणार - सुभाष देसाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. २९ : माहिम चौपाटी येथील परिसर केवळ स्वच्छ न करता या परिसराचे सुशोभीकरण करुन एक नवीन चौपाटी मुंबईकरांना मिळणार आहे, अशी माहिती मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

स्वच्छ भारत अभियान पंधरवड्यानिमित्ताने माहिम चौपाटी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संपदा मेहता, नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, माहिम किल्ल्याची डागडुजी, किनारा स्वच्छ करणे तसेच स्थानिक रहिवाशांसाठी स्वच्छतागृहे बांधून देण्यात येतील. यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.सामान्य जनतेमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी तसेच पर्यटनस्थळी स्वच्छता राखली जावी यासाठी जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे ही मोहीम राबविण्यात येत आहे.


यावेळी लोकप्रतिनिधी, शालेय विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा