नवीन १० परिभाषा कोश निर्मितीसाठी उपसमित्या स्थापन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. ३१ : भाषा संचालनालयामार्फत नवीन १० परिभाषा कोश निर्मिती करण्यासाठी उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहे.

कृषि अभियांत्रिकी परिभाषा कोश उपसमिती, सूक्ष्मजीवशास्त्र परिभाषा कोश उपसमिती, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान परिभाषा कोश उपसमिती, जल व भूमी व्यवस्थापनशास्त्र परिभाषा कोश उपसमिती, सागर विज्ञानशास्त्र परिभाषा कोश उपसमिती, योगशास्त्र परिभाषा कोश उपसमिती, आहारशास्त्र परिभाषा कोश उपसमिती, जैवतंत्रज्ञानशास्त्र परिभाषा कोश उपसमिती, जनसंवाद परिभाषा कोश उपसमिती, आपत्ती व्यवस्थापनशास्त्र परिभाषा कोश उपसमिती अशा १० परिभाषा १० कोश निर्मिती करण्यात येणार आहे.

वरील विषयांकरिता नेमलेल्या उपसमित्यांवर विद्यापीठांच्या / संस्थांच्या/ मंडळाच्या प्रतिनिधींच्या नेमणुकीचे प्राधिकार भाषा संचालनालयाचे भाषा संचालक यांना देण्यात आले आहेत.वरील सर्व उपसमित्यांची मुदत एका वर्षासाठी राहील.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
००००


वर्षा फडके/विसंअ/ 31 जुलै 2017

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा