मुंबई उपनगर जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती निवडणूक बिनविरोध

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. ३१ : मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीवर निर्वाचित करावयाच्या सदस्यांकरिता केवळ मोठे नागरी निर्वाचान क्षेत्र असून महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती निवडणूक १९९९  नियम २७ यानुसार बिनविरोध घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीवर निवडून द्यावयाच्या ४० सदस्यांकरिता निवडणूक कार्यक्रम १३ जुलै रोजी घोषित करण्यात आला होता. दि. २७ जुलै रोजी ही निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली. यात अनसूचित जाती , अनुसुचित जमाती , नागरीकांचा मागासवर्ग १२, सर्वसाधारण वर्ग २५ अशा जागा भरण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा