'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची 'सामाजिक न्याय विभागाच्या लोक कल्याणकारी योजना' या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.


ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  मंगळवार दिनांक १ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी  ७:३० ते ८ या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी ही मुलाखत घेतली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयीची सविस्तर माहिती श्री. बडोले यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा