विधानपरिषद प्रश्नोत्तरे : दि. ३१ जुलै, २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


सायन-पनवेल महामार्गासाठी संपादि केलेल्या
मिनीसंदर्भात चौकशी करणार
- चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. ३१ : सायन-पनवेल महामार्गासाठी तुर्भे येथील सुमारे २.८८ हेक्टर जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाने संपादि केली आहे. या मिनीच्या खरेदीचे व्यवहार इतर विभागामार्फत झाले आहेत काय याची चौकशी केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.

या जमिनीपैकी १.१८ हेक्टर एवढी जमीन सायन-पनवेल महामार्गासाठी वापरण्यात आली आहे. उर्वरीत १.७०  हेक्टर जमीन कार्यकारी अभियंता सुधार विभाग यांच्या नावाने संपादि करण्यात आली आहे. सदर जमिनी बाबत पूर्ण माहिती देता विजय पाटील इतर व्यक्तींनी जमिनीचा व्यवहार करून फसवणूक केली. या मिनीच्या व्यवहारासंदर्भात तक्रार केली असल्याने याची सविस्तचौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री रवींद्र पाटील, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.
०००० 

रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी प्रयत्न करणार
- पांडुरंग फुंडकर

मुंबई, दि. ३१ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीतील ध्या रोजंदारीवर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी प्रयत्न रण्यात येतील, अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

जानेवारी २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील कृषी सहाय्यक या पदाच्या नेमणुकीमध्ये कोणतीही अनियमितता झालेली नसून, यासंदर्भात आलेल्या तक्रारीमुळे कुलगुरु यांच्या मान्यतेने चौकशी समिती नेमण्या आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार या तक्रारीत काही तथ्य नाही असे स्पष्ट झाले आहे, असेही श्री. फुंडकर यांनी सांगितले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य श्रीमती हुस्नबानू खलिफे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
००००

सातारा येथील सहा पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम
लवकर पूर्ण केले जाईल
- प्रवी पोटे-पाटील
मुंबई, दि. ३१ : सातारा येथील सहापदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधि विभागांची बैठक घे यासंदर्भातील रखडलेली कामे लवकरच पूर्ण केली जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवी पोटे-पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदर रस्ता केंद्रीय मार्ग निधीतून मंजूर झाला आहे. म्हणून रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्याशी बोलून पाठपरावा करुन मार्ग काढण्यात येणार आहे.


उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री आनंदराव पाटील, जयंत पाटील, रामहरी रुपनवर, डॉ. नीलम गोऱ्हे आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा