छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर : भूसंपादनाचे चार पर्याय मान्य, जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान - मुख्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. २९ : पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेचे चार पर्याय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर करण्यात आले. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांनी हे चार ही पर्याय मान्य करत त्याअनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे यांना अधिकार प्रदान केले.

आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापटमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकरपुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेचे आणि परताव्याचे चार पर्याय आज मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासमोर सादर झाले. यामध्ये  संपूर्ण मोबदला एकरकमी अदा करणेनिर्वाह भत्त्यासह विकसित भूखंडाचा परतावा देणे (अमरावती-आंध्रप्रदेश येथील विमानतळ विकास मॉडेल), मिनीच्या बदल्यात पर्यायी जमीन देणे आणि मगरपरट्टा सिटी, कोची विमानतळाच्या धर्तीवर विमानतळ विकास कंपनीमध्ये जमीन मालकाला भागधारक करून घेणे या पर्यायांचा समावेश होता. या चारही पर्यायांवर आजच्या बैठकीत र्चा होऊन या चारही पर्यायातून कोणताही पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य बाधित जमीनधारकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे येथील सध्याच्या विमानतळावरील प्रवाशांचा भार पाहता पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाची नितांत गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. २०१५-१६ मध्ये पुणे शहरातील विमान प्रवाशांच्या संख्येत त्या आधीच्या वर्षीच्या तुलनेत २९.३ टक्क्यांनी वाढ झाली  आहे. कृषी उत्पादने, स्मार्ट सिटी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हब अशा विविधांगानी पुणे शहराचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. ही मागणी तसेच प्रवाशांची सोय लक्षात घेऊन पुण्यात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्याचे महाराष्ट्र शासनाने निश्चित केले आहे. या विमानतळासाठी सहा स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पुरंदर येथील जागा तांत्रिकदृष्टया योग्य असल्याने एअरपोर्ट ॲथॉरटी ऑफ इंडिया ने त्यास मान्यता दिली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

शिर्डी विमानतळावरील सुविधांची पाहणी करावी
शिर्डी विमानतळावरील पायाभूत सुविधा व सोयींची सर्व विमान कंपन्यानी जाऊन पाहणी करावी असे आवाहन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. २०१८ मध्ये श्री साई समाधी शताब्दी सोहळा साजरा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस विविध विमान कंपन्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.साई समाधी शताब्दी सोहळ्यासाठी जगभरातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक फार मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल होणार आहेत. साधारणत: ४२ देशातील जागतिक दर्जाच्या मान्यवरांनी त्यांची उपस्थितीही नोंदवली आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, याकाळात गर्दीचे सगळे उच्चांक मोडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता सर्व विमान कंपन्यांनी या सोहळ्यासाठी त्यांची सेवा देतांना  शेड्यूल आणि वेळापत्रक निश्चित  करावे.  शासनाने शिर्डी विमानतळावर २५०० मीटर्स ची धावपट्टी विकसित केली आहे ती ३२०० मीटरपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे लवकरच येथे नाईट लॅण्डिंगची सुविधा उपलब्ध होईल अशी माहिती ही आजच्या बैठकीत देण्यात आली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा