महाराष्ट्र दिन समारंभाची शिवाजी पार्क येथे रंगीत तालिम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त येत्या मे रोजी दादर येथील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या राष्ट्रध्वजवंदन संचलन समारंभाची आज रंगीत तालिम करण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभाग, पोलीस दल यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र दिनी होणाऱ्या संचलनाचा यावेळी विविध पथकांनी सराव केला. प्रजासत्ताक दिनी संचलन केलेल्या उत्कृष्ट पथकांना यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागी यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यात बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल (पुरुष), राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ११ आणि बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल (महिला) यांनी शासकीय गटातील अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. शालेय पथकात हिसर येथील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींच्या रोड सेफ्टी पॅट्रोल पथकास प्रथम तर काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयातील मुलांच्या रोड सेफ्टी पॅट्रोल पथकास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक वितरीत करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा