मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकासासाठी 350.53 कोटींच्या आराखड्यास मंजुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. २९ : मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकसीत आराखडा निर्माण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना 2017-18 साठी 350.53 कोटींच्या आराखड्यास आज शालेय शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक कार्य, मराठी भाषा तथा मुंबई उपनगर जिल्हयाचे पालकमंत्री  विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजना 2017-18 साठी राज्यस्तरावर अंतिम करण्यात आलेले जिल्ह्याची योजनेमध्ये सर्वसाधारण योजना 294.20 कोटी आदिवासी उपाय योजना 06.59 कोटी, अनुसुचित जाती उपाय योजना 49.74 कोटी मंजूर करण्यात आला आहे.

वांद्रे येथील चेतना महाविद्यालय आयोजित जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिमार्ण मंत्री प्रकाश महेता, गृहनिमार्ण राज्यमंत्री रविंद्र वायकर, आमदार सर्वश्री अनिल परब, आशिष शेलार, अतुल भातखळकर, कपील पाटील, पराग अळवणी, प्रविण दरेकर, अमित साटम, भाई गिरकर, सुनिल प्रभु, प्रकाश सुर्वे, अस्लम शेख, संजय लटके, सरदार तारा सिंह, आमदार श्रीमती मनिषा चौधरी, भारती लवेकर, विद्याताई चव्हाण तसेच खाजदार संजय राऊत, गजानान किर्तीकर, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, मुंबई महानगर विकास प्राधिकरण चे आयुक्त युपीएस मदान, अतिरिक्त मनपा आयुक्त संजय देशमुख, गृहनिमार्ण आयुक्त झेंडे साहेब तसेच नगरविकास, गृहनिमार्ण, गृहविभाग, एमएमआरडीए आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील मान्सून पूर्व तयारी व आपत्तकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाय योजना यावर विविध मान्यवरांनी आप आपल्या भागातील विविध समस्या मंत्री महोदयांसमोर मांडून यावर उपाय योजना करण्यासाठी चर्चा झाली. प्रत्येक मान्सूनमध्ये खड्डे, ट्राफिक वाहतुक याबाबतच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मंत्री महोदयांनी पावसाळा सुरु होण्याअगोदर यावर तोडगा काढून कार्यवाही करावी जणे करुन या समस्या पावसाळ्यात निमार्ण होणार नाही.

मुंबई महानगरपालिकेमध्ये मेट्रोची कामे चालू आहेत त्यामूळे वाहतूक समस्या निमार्ण होत आहेत यावर उपाययोजना म्हणून योग्य त्या पायाभूत सुविधा निमार्ण करण्याचे निर्देशही श्री.तावडे यांनी दिले.

मुंबई उपनगर शहरातील पूर्व व पश्चिम महामार्ग एमएमआरडीएकडे हस्तांतरीत करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री यांनी सांगितले. याबाबत एमएमआरडीएने विभागनिहाय आमदारांची बैठक घेवून मतदार संघात येणाऱ्या महामार्ग बाबतच्या येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश श्री.तावडे यांनी दिले.मुंबई उपनगर व शहरामध्ये पाणी साठण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. अशा ठिकाणी मोठमोठे पंपींग स्टेशन उभे करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पावसाळयामध्ये उद्भवणाऱ्या ट्राफीक समस्येमुळे अधिक कर्मचारी उपलब्ध करुन यावर उपाय योजना करण्यात येणार आहेत. मुंबईत पार्कींग समस्येवर अतुल भातखळकर यांनी मुद्दा मांडला होता. यावर बोलताना पार्कींग समस्येवर निवीदा काढून तात्काळ कामे मार्गी लावावे, असे त्यांनी सांगितले.

यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी योजना म्हणून प्रधानमंत्री मुद्रा या योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धी करता एक महिन्यासाठी ओबी व्हॅनचे उद्घाटन पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
०००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा