राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकता दिनाचे आयोजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त आज मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नरीमन पॉईंट येथे सकाळी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल चे. विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखविला.                     

यावेळी राज्यपालांनी उपस्थितांना इंग्रजीमध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मराठीमधून राष्ट्रीय एकता, अखंडता सुरक्षा अबाधित राखण्याबाबत शपथ दिलीयावेळी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, आमदार सर्वश्री राज पुरोहित, राहुल नार्वेकर, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी आदी उपस्थित होते. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा